Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरस्वती देवीच्या प्रतिमा (Saraswati Devi Photo) शाळेत कशासाठी? अशाप्रकारचे विधान करून नवरात्रीच्या (Navratri) पावन पर्वात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राष्ट्रवादीचे (NCP) माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा भाजपच्या (BJP) रोषाला सामोरे जावे, असा इशारा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर (Tambadi Jogeshwari Temple) आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.

 

मुळीक पुढे म्हणाले, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते सैरभैर झाले आहेत. विकासकामांची कोणतीच दूरदृष्टी नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत ही मंडळी बेताल वक्तव्य करीत आहेत. हिंदुत्वाशी फारकत घेतलेल्या शिल्लक सेनेने (Shivsena) याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.’

 

यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, प्रमोद कोंढरे,
रवींद्र साळगावकर, सचिन मोरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Chhagan Bhujbal |Chhagan Bhujbal should apologize to the Hindu community

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…