शिवसेनेसाठी हिच ती वेळ, छगन भुजबळांनी सेनेला दिला ‘हा’ सल्ला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. सत्तेत वाटा मिळावा यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ने छगन भुजबळ यांनी शिवसेनेला एक मोलाचा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी आडून राहण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठख सुरु आहे. या बैठकीला जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी शिवसेनेसाठी हीच ती वेळ आहे. त्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहिले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत.

मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. तर भाजपने आक्रमक होत मुख्यमंत्रीपदावर कोणतीही तडजोड करायची नाही, यावर ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने विरोधी पक्ष म्हणून राज्यात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

Visit : Policenama.com