Chhagan Bhujbal | देवी देवतांचा अपमान सहन करणार नाही, भुजबळांना भाजपाचे प्रत्युत्तर, शाळेतील शारदा मातेच्या फोटोच्या वक्तव्यावरून वाद (व्हिडीओ)

मुंबई : Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवतांबाबत एवढी चीड का? हा खरा सवाल आहे. आज आमच्या देवी-देवतांचे फोटो खटकतात. उद्या आमची मंदिरेही खटकतील. उद्या मंदिरे कशाला पाहिजेत, तीही पाडून टाका म्हणतील, अशी टीका मुंबईतील भाजपा (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर केली आहे.

छगन भुजबळ यांनी आज सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashwantrao Chavan Pratishthan) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शाळांमध्ये लावण्यात येणार्‍या देवी-देवतांच्या फोटोबाबत वक्तव्य केले.

भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmveer Bhaurao Patil) लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची?

(Chhagan Bhujbal) भुजबळ पुढे म्हणाले की, ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं,
अधिकार मिळाला त्यांची पूजा करा. हे तुमचे देव असले पाहिजेत.
यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया.

भुजबळ यांच्या या वक्तव्याचा भाजपा आणि ब्राह्मण संघटनांकडून (Brahmin Organization) निषेध करण्यात येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी भुजबळांच्या विधानावर वरील प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की,
आता राष्ट्रवादीचे जोडीदार श्रीमान पेंग्विन सेनेची काय भूमिका हे त्यांनी स्पष्ट करावे.
सर्व महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत मात्र देवी देवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

Web Title :- Chhagan Bhujbal | controversial statement about saraswati sharda photo in school bjps counterattack on chhagan bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Joint Pain | नवजीवन वेदनाहर तेल व चुर्ण सांधेदुखीवर रामबाण उपाय, एकदा वापरा सांधेदुखीला करा कायमचा राम राम

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो का?, ज्यांना पाहिलं नाही, ज्यांनी…, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भाजपा, ब्राह्मण संघटनांचा आक्षेप