Chhagan Bhujbal Criticize BJP | पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू म्हणणार्‍या BJP नेत्यांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘बारामतीच्या नादाला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal Criticize BJP | भाजपाने बारामतीच्या (Baramati) नादाला लागू नये. हे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्या-सलत्या ठिकाणी कुठे जात आहात, असे म्हणत बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी उतावीळ झालेल्या भाजपा नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सुनावले आहे. (Chhagan Bhujbal Criticize BJP)

 

बारामती मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येणार. बारामतीत पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला उद्ध्वस्त करू, अशी विधाने भाजपा पदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) आणि इतर नेत्यांनी केली आहेत. यावरून भुजबळांनी त्यांना रोखठोक सुनावले आहे. भाजपाने बारामतीच्या नादाला लागू नये असे त्यांनी म्हटले आहे. ते मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Chhagan Bhujbal Criticize BJP)

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Elections) भाजपा नेते अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेदखील गणपती मंडळांना सातत्याने भेटी देत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे.

भुजबळ म्हणाले, गणपती बाप्पांनी सत्तेत असणार्‍यांना सुबुद्धी द्यावी.
सरकारने घोषणांच्या पलिकडे जाऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत.
नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही. हे नवे सरकारच विघ्नहर्ता आहे अशी त्यांनी जाहिरात केली आहे.
ते म्हणतात त्यांचे सरकार आले आणि हिंदू सणांवरील विघ्न कमी झाले. त्यामुळे या विघ्नहर्तापेक्षा तेच विघ्नहर्ता झाले आहेत.

 

शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) सल्ला देताना भुजबळ म्हणाले,
आज राज्यात अनेक विघ्न आहेत. ही विघ्न या सरकारने दूर करावीत. बेरोजगारी,
महागाई अशा अनेक अडचणी आहेत. शेतकर्‍यांच्या अडचणी आहेत. मुसळधार पाऊस पडत आहे.
हेही विघ्न या सरकारने दूर करावे.

 

Web Title :- Chhagan Bhujbal Criticize BJP | NCP senior leader chhagan bhujbal criticize bjp over remarks on sharad pawar baramati constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स

 

Diabetes | जेवणानंतर केवळ 5 मिनिटे करा हे काम, नियंत्रणात राहील डायबिटीज