Chhagan Bhujbal | ‘पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात आणि भाषणावर GST’ – छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले याचा मला मनापासून आनंद आहे. पण मला आनंद वेगळ्याच गोष्टीमुळे झाला आहे. काळी दाढी असणारे ते राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात सध्या माझ्यासारख्या पांढर्‍या दाढीचा प्रभाव आहे. देशात पांढरी दाढी आणि राज्यात काळी दाढी प्रभावशाली ठरत आहे. पण GST वरुन लोकांच्या भावना काय आहेत त्याही केंद्रात तुम्ही सांगा. तुमचे केंद्रात खूप वजन आहे, अशा खुमासदार शैलीत आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधार्‍यांना फैलावर घेतले. (Chhagan Bhujbal)

 

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधार्‍यांना विविध प्रश्नांवरुन धारेवर धरल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. आज विधानसभेत छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भुजबळांना म्हटले की, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीचा उल्लेख बिलात नाही, पण तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि तुम्हाला बोलायचे असेल तर बोलू शकता. (Chhagan Bhujbal)

यावर भुजबळ म्हणाले, भारतात मंदी नाही असे तुमचे म्हणणे आहे मग जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याची वेळ का आली ? एखाद्या वस्तूवर जीएसटी लावला की त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो. आता हे बिलात नाही असे तुम्ही म्हणत असाल पण केंद्रातले तुमचे वजन वाढलेय असे मी आजच वृत्तपत्रात वाचले म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या भावना केंद्रात सांगा. तुमचा दरारा आता दिल्लीत वाढला आहे. मुख्यमंर्त्यांनाही सोबत घेऊन जा आणि केंद्राला समजावून सांगा जीएसटीचा फार वाईट परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांवर होतो. देशाचे लक्ष तुमच्या दोघांकडे लागले आहे.

 

मोदी सरकारवर (Modi Government) टीका करताना भुजबळ पुढे म्हणाले, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पेन्सिल, रबरवरही जीएसटी लावला.
रुग्णालयाच्या 5 हजारांच्यावरील बिलावरही तुम्ही जीएसटी लावला.
हे काय चालले आहे ? आता देशात फक्त भाषणावर जीएसटी लावलेला नाही.
नाहीतर तुमचे भाषण एक मिनिट झाले आता एवढा जीएसटी भरा असेही सांगितले जाईल.

 

Web Title : –  Chhagan Bhujbal | government now will impose gst on speech also says chhagan bhujbal speech in vidhan sabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा