पुणे: पोलीसनामा ऑनलाईन- महात्मा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ‘महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा 2022’ पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी (Chhagan Bhujbal) सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) महाराष्ट्रातील शाळांमध्ये होणाऱ्या सरस्वती पूजेला लक्ष करत म्हणाले, “निफाडमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथे समोर सरस्वतीचा फोटो होता, त्या फोटोची पूजा मी करणार नाही असे सांगितले. जर आपले शिक्षकच असे असतील तर विद्यार्थ्यांचे काय? शिक्षण म्हणजे दीनदलितांच्या उद्धारासाठी एक प्रभावी अस्त्र-शस्त्र आहे. बाकी अंधश्रद्धा आहेत, त्या काही जात नाहीत.”
“शाळांमध्ये सरस्वती पूजन कशाला? पूजा करायची तर ज्यांनी राज्यक्रांती घडवली ते छत्रपती शिवाजी महाराज, सामजिक क्रांती घडवली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी कायदा तुम्हाला दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची पूजा करा. ज्यांनी 150 वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. भाऊराव पाटलांची पूजा करा. त्यांच्यामुळे लाखो लोक आजही शिकून मोठे होता आहेत. अण्णासाहेब कर्वेंची पूजा करा. सरस्वती कुठून आली? किती शाळा काढल्या. तुमच्यातल्या किती लोकांना शिकवलं? म्हणजे शिक्षण सरस्वतीने दिले, असे आपण मानतो. मग महात्मा फुले यांना हे पाऊल का उचलावं लागलं? फुलेंच्या अगोदर आपल्या सगळ्या समाजाला शिक्षण का मिळालं नाही. आपल्या जाऊ द्या, ब्राह्मण समाजातील महिलांनाही शिक्षण का मिळत नव्हतं. शिक्षण केवळ पुरुषांना शिक्षण हे काम होतं का?” असा प्रश्नही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले,” मी ब्राम्हण विरोधी नाही. महात्मा फुले सुद्धा ब्राम्हणविरोधी नव्हते,
ते ब्राह्मणवादाच्या विरोधात होते. त्याकाळी अनेक ब्राम्हणांनी महात्मा फुलेंची मदत केली.
पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात त्यांचीच बदनामी केली जाते. ते ज्या स्त्रियांसाठी काम करत होते त्या स्त्रियांची बदनामी होते.
आमच्या महापुरुषांना बदनाम करायची ताकद यांच्यात येते कुठून?” असा प्रश्न त्यांनी रामदेव बाबा यांनी
ठाण्यात केलेल्या वक्तव्याचा आणि राज्यपालांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत केला.
छगन भुजबळ यांनी पुढे महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल जाणीव असून ही त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षावर टीका केली.
ते म्हणाले, ‘ लोकांना 6 डिसेंबरला मुंबईला यायला सांगावं लागत नाही. तिथे 10-15 लाख लोक उन्हातान्हात
उभे राहतात. शिवजयंतीला रायगडावर जायला कोणाला सांगावं लागत नाही. तिथे सुद्धा लाखो जण जातात.
पण महात्मा फुलेंबाबत असं काही घडत नाही. लोकांचा रेटा लावावा लागतो.
अनुयायी लाखो आहेत पण पुढे कोण येत नाही.” पुढे स्त्री शिक्षणासाठी प्रचंड त्रास सहन करणाऱ्या
सावित्रीबाईंचा आदर्श घ्यायचा सोडून स्त्रिया, त्यांची ऊर्जा नको त्या ठिकाणी वाया घालवत आहेत,
या बद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्या भगिनींना सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण मिळालं.
पहिल्या शाळेत 6 मुली होत्या. त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या.
दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष गायला 25-50 हजार महिला सामुहिक वाचन करायला येतात.
पण सावित्रीबाईंनी जिथं पहिली शाळा उभारली तिथे जाऊन क्षणभर मस्तक ठेवावं असं कुणालाही वाटत नाही.
Web Title :- Chhagan Bhujbal | how many schools did saraswati build how many people did she teach statement of ncp chhagan bhujbal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update