Chhagan Bhujbal | भुजबळांनी सरकार आणि पक्षालाही सुनावले, ‘सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे…’

मुंबई : राज्य सरकारमधील (State Govt) कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारविरोधी भूमिका घेतल्याने राज्य सरकार आणि अजित पवार गट दोघेही अडचणीत सापडले आहेत. आता तर छगन भुजबळ यांनी दोघांनाही सुनावले आहे. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवले आहे, तसेच पक्षालाही झिडकारले आहे.

मराठा आरक्षणविरोधातील (Maratha Reservation) तुमची आक्रमकता सरकारला आव्हान देणारी नाही का, असे विचारले असता भुजबळ म्हणाले, सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे. कायदा वगैरे काही आहे की नाही? आमच्या सभा रात्री १० वाजता बंद केल्या जातात, त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, हे बरोबर नाही.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मी आधी आक्रमक झालो नाही; परंतु त्यांनी गावबंदी करायची, लोकांची घरे जाळायची, पोलिसांना जखमी करायचे, आम्ही गप्प बसायचे का. माझी भूमिका मी घेऊन निघालो आहे, पक्षाचा मला पाठिंबा आहे की नाही याचा मी विचार करत नाही, असे म्हणत भुजबळ यांनी पक्षाला देखील झिडकारले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक