Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी मंत्री रावसाहेब दानवेंना मारला टोमणा, म्हणाले – ‘कदाचित त्यांना शिवसेनेत यायचं असेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमादरम्यान मोठं विधान केलं आहे. कार्यक्रमादरम्यान भाजपा नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला आहे. या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. यावर अनेक नेते, मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधान करताना व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) देखील उपस्थित होते. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रावसाहेब दानवे याच्यांवर निशाणा साधला आहे.
रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे.
तसेच, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, ‘चांगली गोष्ट आहे. राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात.
वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही.
कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर?’ असा टोमणा भुजबळ यांनी मारला आहे.

 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत असलेल्या त्रासामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपाला भावी सहकारी म्हटलं असेल असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.
या विधानावरुन छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, फडणवीसांच्या विधानाशी मी सहमत नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही.
उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली हे सर्वांनी बघीतलं आहे.
त्यावर काही बोलण्याची मला गरज वाटत नाही.
केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेलं मंत्रीपद आणि केलेली अवहेलना देखील आपण पाहिली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

 

Web Title : Chhagan Bhujbal | maybe minister raosaheb danve wants join shiv sena says chhagan bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Money laundering Case | सचिन वाझेचा खुलासा – ‘शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले होते’

Ahmednagar Crime | धक्कादायक ! 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून अत्याचार

PAK vs NZ | PM इम्रान खान सुद्धा वाचवू शकले नाहीत पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट सीरीज, सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या क्षणी रद्द