Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा पलटवार, म्हणाले – ‘कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) चिघळला आहे. संपावर अजुनही तोडगा निघाला नसल्याने राज्यात सर्व बसेस सुरू नाहीत. यानंतर कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कामगारांच्या कृती समितीने (Action Committee) राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यानंतर पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. यावरून भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार आणि अनिल परब यांच्यावर टीका केली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पलटवार केला आहे.

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, ‘राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवणे ही महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे.
त्यामुळेच शरद पवार यांनी एसटी संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
कोणलाही शरद पवार यांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारणच काय? शरद पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते आहेत.
त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे.
तसेच, शरद पवार हे महाविकास आघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत.
महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाचा तिढा 2 महिन्यांपासून सुटलेला नाही.
त्यामुळे शरद पवार यांना कामगारांची काळजी वाटणे साहजिक आहे.

पुढे भुजबळ म्हणाले, ‘शरद पवार किंवा मी, आम्ही दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत झालेला गिरणी कामगारांचा संप बघितला आहे.
हा गिरणी संप संपल्याचे आजवर कोणीही जाहीर केलेले नाही.
त्यामुळे गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागले.
एवढा अट्टाहास करता कामा नये.
एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्कही शरद पवार यांना असून, त्यांना काळजी वाटणे साहजिक असल्याचं ते म्हणाले.

 

काय म्हणाले होते पडळकर ?
शरद पवारांची कृती समितीसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं.
यानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून शरद पवारांना चर्चा करावी लागली.
एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो.
कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असं पडळकर म्हणाले होते.

 

Web Title :-  Chhagan Bhujbal | NCP leader and minister chhagan bhujbal replied gopichand padalkar over sharad pawar criticism st workers strike MSRTC

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मुलींचे फोटो मॉर्फिंग करण्याचा प्रकार उघड, बनवत होता ‘नग्न’ अश्लिल फोटो पोलिसांकडून एकाला अटक

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

 

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या ‘स्पीड’ आणि ‘चार्जेस’