Chhagan Bhujbal | ‘पुणे मनपात जे घडलं ते अपघातानं, मुख्यमंत्री असलं काम करत नाहीत’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) धक्काबुक्की झाली होती यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या घटनेनंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला असा आरोप (Allegation) केला. यावर राष्ट्रवादीचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं आहे. पुणे महापालिकेत जे घडलं ते अपघातानं (Accident) घडलं, मुख्यमंत्री असलं काम करत नाही असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबद्दल होईल आणि भाजपची सत्ता येईल, असे विधान केले होते. या विधानानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले ? अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) हे फार काही दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) 10 मार्च रोजी लागल्यानंतर तशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल, असं पाटील म्हणाले होते.

 

खोट्या केसेस करुन आम्हाला किती दाबणार ?
राज्यात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे तो आम्ही सहन करणार नाही.
किरीट सोमय्या यांचा सत्कार करुन काल पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) खोट्या केसेस करुन पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | NCP leader chhagan bhujbal has taunt to bjp leader chandrakant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा