Chhagan Bhujbal | ‘…मग मंदिरातील उघडेबंब पुजाऱ्यांनी सदरा घालाव’, मंदिरातील ड्रेसकोड वादावर भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – तुळजापूर मंदिरात (Tuljapur Temple) ड्रेसकोड (Dress Code) लागू केल्यानंतर भाविकांनी यावर आक्षेप घेतला. भाविकांचा विरोध पाहून मंदिर प्रशासनाने चोवीस तासात निर्णय मागे घेतला. यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी परखड भूमिका मांडली आहे. तसेच मंदिरातले पुजारी उघडे का असतात? असा संतप्त सवाल करत त्यांनीही सदरा वगैरे घालावा, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने (Maharashtra Temple Federation) मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात (Saptashrungi Devi Temple) येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे हा मूर्खपणा आहे, अशी जोरदार टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

छगन भूजबळ म्हणाले, मंदिरात जाताना शाळेला सुट्टी आहे. तो हाफ पँट घालूनच मंदिरात जाणार ना? त्या मुलाला हाफ पँट घातली म्हणून बाहेर काढण्यात आलं. हा तर मूर्खपणा आहे. तुम्ही अगदी वाट्टेल तसे कपडे घालून मंदिरात जाऊ नये हे मलाही मान्य आहे. मात्र अगदी सगळ्यांनीच नियम पाळायाचा असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यात जे उघडेबंब असणारे पुजारी (Priest) असतात त्यांनीही सदरा वगैरे घालावे. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे. पुजारीही अर्धनग्नच नसतात का? धोतर नेसावं, तुळशीमाळा घालाव्यात, सदरा घालाव त्यावरुन ओळखू येईल की हा पूजारी आहे. पण नाही… ते उघडेच पाहिजेत.

महाराष्ट्र सदनातील पुतळे हटवण्याची गरज काय?

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar)
यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) आणि अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांचे पुतळे हटवण्यात आले. यावरुन छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. परंतु या कार्यक्रमासाठी पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title : Chhagan Bhujbal | ncp leader chhagan bhujbal reaction on temple dress code

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोल्हापूर जिल्हयातील दरोडेखोरांच्या टोळीला अटक ! 25 लाखाचा माल जप्त, सातारा येथून सोनं-चांदी लुटलं होतं; जाणून घ्या स्टोरी

Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

Maji Sainik Sanghatana | माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात