Chhagan Bhujbal | नितीन गडकरींच्या आश्वासनाची छगन भुजबळांनी करून दिली पत्र लिहून आठवण; जाणून घ्या संपूर्ण प्रकार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal | मुंबई-आग्रा महामार्गातील नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिटचा रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2021 ला नाशिकमध्ये रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी दिले होते. आता त्यांच्या आश्वासनाची आठवण महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी करून दिली आहे.

 

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नव्याने गडकरींना पत्र पाठवले आहे. मुंबई-आग्रा महामार्गातील नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिटचा रस्ता करण्यात यावे आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी गडकरींना पत्र लिहिले आहे.

सदर सहापदरी महामार्ग भारतमाला प्रोजेक्टमध्ये समावेश करून त्याचे भूमिपूजन करण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी मागील वर्षी दिले होते. नितीन गडकरी यांनी 4 ऑक्टोबर 2014 रोजी नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केली होती.
त्यामुळे आता लवकरात लवकर या सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले
जावे आणि नाशिक ते मुंबई हा चार पदरी रस्ता आहे.
या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता रहदारीचा आहे.
शहापुर ते वडपे या रहदारीच्या परिसरात कुठेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होत असल्याचे भुजबळ पत्रात म्हणाले आहेत.
या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे संपूर्ण नूतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबीमधील कामाचे डागडुजी करण्याची आवश्यकता आहे,
ही बाब छगन भुजबळांनी नितीन गडकरींच्या समोर मांडली.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | ncp leader chhagan bhujbal writes a letter to union minister nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत