Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) गुढी पाडव्या (Gudi Padwa) दिवशी महाविकास आघाडीवर गरजनाता दिसले. मात्र भाजपवर (BJP) त्यांनी टीका केली नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी त्यांना निशाण्यावर धरलेलं पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी पाडव्या दिवशी छगन भुजबळ यांच्यावरही तोफ डागली होती.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला. छगन भुजबळ, जे जवळपास दोन अडीच वर्ष जेलमध्ये होते.
ते काय स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighter) नव्हते की सत्ता आल्या आल्या त्यांना तुम्ही मंत्रिपद द्यायला असं राज ठाकरे म्हणाले होते.
यावर, एवढं एकदम भाजपविरोधात बोलता बोलता फक्त ईडीने (ED) त्यांना फक्त बोलवलं तिकडे.
तेव्हापासून इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचं काय कळतं नाही हे, असं छगन भुजबळ म्हणाले.

सगळं पाहिलं तर सभा झाल्यावर ती सभा भाजपची होती की मनसेची ?, हे कळत नाही.
राज ठाकरे छान बोलतात म्हणून लोक त्यांना पाहायला येतात मात्र त्यानंतर ते काय वागतात हे लोकांच्या लक्षात नाही, असं म्हणत भुजबळांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे सभेमध्ये भाजपचा प्रचार करत होते, स्टेजवर फक्त भाजपचे झेंडे (BJP Flag) लावायचे बाकी होते.
त्यांनी आता ट्रॅक बदलला आहे मात्र भाजप त्यांना घेतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं भुजबळ म्हणाले.

 

Web Title :- Chhagan Bhujbal On Raj Thackeray | NCP leader chhagan bhujbal slams mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा