Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य, शरद पवारांच्या ‘त्या’ कृतीवर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Political News | chhagan bhujbal blackmailed to sharad pawar for getting bail said former mla ramesh kadam

मुंबई : Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्यात माझी बदनामी झाली. वास्तविक मी गृहमंत्री (Maharashtra Home Minister) असताना तेलगीला मोक्का लावला. त्याची सीबीआय (CBI) चौकशी झाली. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार (BJP Govt) होते. सीबीआयने दोन आरोपपत्रे दाखल केली, त्यात माझे नाव नव्हते. नंतर यूपीए सरकारच्या काळात दाखल आरोपपत्रातसुद्धा माझे नाव नव्हते. तरीही माझा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला, अशी खंत छगन भुजबळ यांनी केली आहे. (Chhagan Bhujbal On Telgi Scam)

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या मनातील हे शल्य व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील ही नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे.

भुजबळ म्हणाले, माझी काही चूक नसताना राजीनामा घेतला आणि माझ्या नावाची बदनामी झाली. हे शल्य माझ्या मनात कायम आहे. मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरून ५ व्या, ५ व्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलो. हे कशासाठी केले हा फक्त प्रश्न विचारला, त्यावर एवढे काहूर माजले. सगळे खूप रागावले, त्यामुळे यापुढे या विषयावर बोलायचे नाही, असे मी ठरवले आहे. (Chhagan Bhujbal On Telgi Scam)

भुजबळ म्हणाले, मी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची गोष्टच वेगळी होती. त्या वेळी मी कुठे कटू भूमिका घेतली होती? मी शांतच होतो. पण ते सारखे मला लखोबा, लखोबा म्हणायचे आणि ते व्यंगचित्र काढणे वगैरेतून वाद वाढत गेला. मग मी म्हटले की आपणही बोलायला पाहिजे. परंतु कुठे थांबायचे हे आम्हाला कळले.

पुढे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावरील खटला मागे घेतल्यानंतर,
बाळासाहेबांनी मला सहकुटुंब जेवायला बोलावले, सर्व मिटले. आता मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाही.
मी फक्त चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही येवल्यात आलात, भुजबळांना विरोध, बीडमध्ये गेलात मुंडेंना विरोध,
कोल्हापुरात गेलात मुश्रिफांना विरोध, बारामतीत गेलात, तिथे म्हणालात की अजित पवार आमचे नेते आहेत,
हे बरोबर आहे का? असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला.

भुजबळ म्हणाले, शरद पवार यांचे काम मी जवळून पाहिले आहे.
तीस वर्षे मी त्यांच्यासोबत होतो, त्याचा ठसा आमच्या मनावर आहे.
नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून आम्ही बघतो. त्यांचे काम चांगले चालले आहे,
त्यांच्या कारकीर्दीत चांगले निर्णय झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma Andhare – Devendra Fadnavis | संघाचा फडणवीसांविरोधात नाराजीचा सूर; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट, म्हणाल्या – ‘पंकजा यांना बळ…’

Total
0
Shares
Related Posts