Chhagan Bhujbal | ‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात परिवरर्तन होईल’ – छगन भुजबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. शुक्रवारी त्यांची शेगावमध्ये सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांच्या या यात्रेची दखल प्रसार माध्यामांनी देखील घेतली आहे. त्यावर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे (NCP) नेते, आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तन होईल, असे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले आहेत.

चित्रपट, वैचारीक, मिडीया, राजकारण आणि शेतकरी क्षेत्रालील लोक राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या यात्रेतून देशात एक ऊर्जा तयार झाली आहे. त्यांच्या यात्रेच्या माध्यमातून एक नवीन दिशा नागरिकांना मिळाली आहे. अन्यायग्रस्त लोक त्यांच्या सोबत चालत आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रेतून देशात परिवर्तन होईल, असे यावेळी भुजबळ म्हणाले. या यात्रेमुळे देशात नवीन काहीतरी होईल, असेही छगन भुजबळांनी सांगितले.

यावेळी त्यांनी वीर सावरकर यांच्यावर सुरु असलेल्या वादावर देखील भाष्य केले.
राहुल गांधी यांना सावरकरांवर मत टाळता आले असते, तर बरे झाले असते.
इतिहासात प्रत्येकातच काहीतरी कमी जास्त आढळते, असे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले आहेत.
अलीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru),
इंदिरा गांधी (Indira Gandhi), राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचे देशासाठी बलिदान आणि त्यांचे नाव आले नाही.
पण सावरकरांवरुन जे लोक आता रस्त्यावर आले आहेत, त्यांचे स्वातंत्र्यासाठी काय योगदान होते?
असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. निवडक सावरकर घेणे, चुकीचे आहे.
राहुल गांधींनी असल्या प्रश्नांना आणि लोकांना बगल दिली तरी चालेल.
आज आपल्यासमोर इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आतापर्यंत चांगली चालली होती.
गेले अनेक दिवस प्रसार माध्यामांनी त्याची दखल घेतली नाही.
पण आता ती यात्रा वादाच्या भोवऱ्यात आल्यावर सर्व वाहिन्या त्याची दखल घेत आहेत.
त्यामुळे याचा फायदा राहुल गांधी यांना झाला आहे, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

Web Title :-  Chhagan Bhujbal | ‘Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra will change the country’ – Chhagan Bhujbal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T-20 World Cup | टी-20 विश्वचषकातील पराभव BCCI च्या जिव्हारी लागल्याने निवड समिती केली बरखास्त

India Lockdown | कोरोनाच्या टाळेबंदीची दाहकता दाखवणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला