‘ही’ लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी vs संविधान : छगन भुजबळ 

रायगड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक होत आहेत. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. निर्धार परिवर्तन यात्रा ही एक लढाई आहे. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात संविधानाची आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवरायांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी रयतेचं, लोकशाहीचं राज्य केलं. मात्र भाजप सरकार काय खायचं, प्यायचं आणि लिहायचं हे ठरवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

देशाच्या विकासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. देशाचा, राज्याचा विकास भकास झाला आहे. मोदी सरकार नोटाबंदी ते राफेल निर्णयापर्यंत फेल गेले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण हे निवडणूक जुमला आहे. आता ओबीसीत आरक्षणात पाच याचिका दाखल झाल्या. मात्र सरकारने विरोध करायला हवा होता. पण तो झाला नाही, त्यामुळे आता आरक्षण राहील की जाईल, अशी चिंताही त्यांनी भुजबळांनी व्यक्त केली.

मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. लेखिका नयनतारा सहगल यांच्यावर राज्य कारभाराचा दबाव आणला जात आहे. सरकार असंवेदनशीलता असल्याचं लिखाण केल्याने दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकार संवेदनावर घालत आहे. हे मोदी सरकार लोकशाहीचं सरकार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, ही यात्रा 25 फेब्रुवारीपर्यंत निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढली जाणार आहे. यात्रेदरम्यान राज्यात किमान 75 सभा घेतल्या जातील. रोज तीन सभा घेऊन दुष्काळ, ग्रामीण शहरी समस्या, आरक्षण, हमीभाव, फसवी आश्वासने, कर्जमाफी या गंभीर समस्यांवरून राष्ट्रवादी हल्लाबोल करणार आहे.