Chhagan Bhujbal | ‘मी जयंत पाटलांना फोन केला नाही, पण…’, छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने चौकशी (Jayant Patil ED Inquiry) केली. चौकशी पूर्वी आणि नंतर जयंत पाटील यांना अनेक नेत्यांनी फोन करुन त्यांची चौकशी केली. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी फोन केला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कुठलेही वाद नसल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला नाही, पण आम्ही सगळे बरोबर आहोत. जयंत पाटील यांना मी पण फोन केला नाही. म्हणजे मी त्यांच्या सोबत नाही, असे नाही, असेही भुजबळ म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सगळे भाऊ असून लहान मोठा हे कशावरुन ठरवायचे? तिन्ही भाऊ एकत्र बसून सूत्र ठरवणार आहेत, असे ही भूजबळ यांनी सांगितले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, यासंदर्भात अनिल देशमुख यांनाच विचारा, कुणाला ऑफर येते का माहिती नाही, मला कल्पना नाही. पण तिकडे गेले तर माणसासहित कपडे धुवून निघतात, अशी टीका भाजपवर केली.

 

पंतप्रधान हे पक्षाचे लेबल असते

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून (New Parliament House Inauguration) सुरु असलेल्या वादावर बोलताना भुजबळ म्हणाले, जुन्या संसद भवनाचे वेगळे स्थान असून आता नवनवीन केले जात आहे. पॉलिसी आणि देश चालवणारे पहिल्या क्रमांकाचे भवन आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन महत्वाचे असून पंतप्रधान हे पक्षाचे लेबल असते, असे मत भूजबळ यांनी व्यक्त केले.

 

सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मान आणि केजरीवाल हे महाराष्ट्रात येत आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट होणार असून त्या बैठकीला मि जाणार आहे.
काही निर्णयाच्या विरोधात सगळे येण्याचा उद्देश असून सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे,
अशी विरोधकांची धारणा आहे. यामुळे बदलीपेक्षा आपण काही करु शकत नाही.
अधिकाऱ्यांच्या हातात नाड्या असल्या पाहिजे. दुसरीकडे दिल्लीत दात, नखं काढून घेण्याचा प्रकार घडला आहे.
यापार्श्वभूमीवर केजरीवाल सगळ्यांना भेटत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Chhagan Bhujbal | three parties will decide together in mahavikas aghadi says chhagan bhujbal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा