Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसण्यास सांगितले आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांना व्याधी असू शकतात आणि ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण? उपोषणामुळे कुणी दगावले, तर याची जबाबदारी जरांगेवर टाकावी. त्याच्यावर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil) यांनी केली.

अधिवेशनात मंजुर केलेल्या मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मनोज जरांगे यांनी २४ फेब्रवारीपासून गावागावात रास्तारोको आंदोलन करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनाही आमरण उपोषण करण्यास सांगितले आहे, यावरून भुजबळ यांनी वरील टीका केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर केला आहे.
एकमताने या कायद्याला मान्यता दिली. पण मनोज जरांगेला हा कायदा मान्य नाही. तो पुन्हा आंदोलनाला लागला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचे शेपूट असून कधीच संपणार नाही.
एकामागून एक मागण्या त्याच्याकडून पुढे केल्या जातात.

छगन भुजबळ म्हणाले, जरांगेला कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही.
माझी मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे.
त्यामुळे जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो कधीही थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा त्याला चढली आहे.
त्याला सारखी प्रसिद्धी हवी असते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि खाली गादीवर तो बसलेला असतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी