×
Homeताज्या बातम्याChhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो का?, ज्यांना पाहिलं नाही, ज्यांनी..., छगन...

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो का?, ज्यांना पाहिलं नाही, ज्यांनी…, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भाजपा, ब्राह्मण संघटनांचा आक्षेप

मुंबई : Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. ते अखिल भारतीय समता परिषदेच्या (Akhil Bhartiy Samata Parishad) व्यासपीठावर बोलत होते. या वक्तव्यावर भाजपा (BJP) आणि ब्राह्मण संघटनांनी (Brahmin Organization) आक्षेप घेतला आहे.

आपल्या भाषणात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmveer Bhaurao Patil) लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची?

भुजबळ म्हणाले, ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा. हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आणि काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमचे देव आणि देवतांबद्दल इतकी चीड का? हा खरा सवाल आहे.

राम कदम म्हणाले, आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील.
मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असेही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत.
परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी म्हटले की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मीयांचा अपमान केला आहे.
कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही.
परंतु जाणूनबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा? असे तारे तोडले आहेत.
हिंदु महासंघाचा या विधानावर आक्षेप आहे.
महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादीचे जुने धोरण छगन भुजबळ अंमलात आणत आहेत.
त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

Web Title :- Chhagan Bhujbal | why photo of saraswati in school why worship her new controversy with chhagan bhujbal statement bjp criticized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Pune Crime | वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या कामगाराला चोर समजून बेदम मारहाण, 6 जण ताब्यात

Vitamin D deficiency | ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

Must Read
Related News