Chhagan Bhujbal | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का?, छगन भुजबळ म्हणाले- ‘त्यांच्या मनात दु:ख आहे, त्या…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नारज असल्याची चर्च गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) सुरु आहे. तसेच त्यांनी अनेकवेळा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या मनात स्थानिक नेत्याबाबत दु:ख आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या मोदी आणि शहांना भेटणार असून हा योग्य मार्ग आहे, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

 

ओबीसी मेळाव्याच्या (OBC Melava) निमित्ताने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नागपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपवर (BJP) मोठ्या प्रमाणात ओबीसी नाराज आहेत. यावर भाजपने विचार केला पाहिजे. ओबीसी डावलले जात असल्याचे लक्षात येताच भाजपने बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रदेशाध्यक्ष केलं असंही भुजबळ म्हणाले. भाजपने मुंबई महापालिका (BMC) लक्ष्य ठेवले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बद्दल मी बोलणे योग्य नाही त्यांनी स्टॅलिन सोबत का तुलना केली हे माहिती नाही. याबाबत त्यांनाच विचारा. प्रत्येक नेत्यांनी टीका करताना मर्यादा संभाळून बोलले पाहिजे.

 

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडें बाबत वक्तव्य केलं, ते म्हणाले, पंकजा मुंडे या राष्ट्रावादीत येणार का याची मला कल्पना नाही. त्या राष्ट्रवादीत येतील असं वाटत नाही. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

 

संजय राऊतांना सल्ला

Advt.

यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)
एकत्र असताना एकमेकांवर शेरेबाजी करणं टाळलं पाहिजे. अशानं वज्रमुठीवर (Vajramuth Sabha) लोकांचा विश्वास राहणार नाही,
असं भुजबळ यांनी म्हटलं. लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना भुजबळ म्हणाले, लोकसभेच्या राज्यात 48 जागा आहेत.
जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्यावर चर्चा करु नये, असेही भूजबळ यांनी सांगितले.

 

Web Title :  Chhagan Bhujbal | Will Pankaja Munde join NCP?, Chhagan Bhujbal said- ‘He has sorrow in his heart, that…’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा