Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पदावर डोळा आहे. ते मिळवण्यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शरद पवारांच्या (Sharad Pawar) नजरेत एक नंबर राहण्यासाठी त्यांना जाणता राजा म्हणत असल्याची टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर बावनकुळेंवर असून शरद पवार आम्हाला गोर गरीबांचा जाणता राजा (Janata Raja) वाटतात. पण तुम्ही मोदींना (PM Narendra Modi) विष्णूचा अवतार म्हणतात, आम्ही काय म्हणतो का? असा सवाल भुजबळ यांनी बावनकुळेंना विचारला आहे.

 

राज्यात महापुरुषांवर करण्यात येणाऱ्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. यातच शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल नाशिकमध्ये स्पष्टीकरण दिले होते. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला होता. त्याला भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. यावरुन भुजबळ आणि बावनकुळे यांच्यात शाब्दीक वॉर पाहायला मिळत आहे.

 

माझा डोळा फक्त…

छगन भुजबळ म्हणाले, मी नेहमीच एक नंबर असून पद पाहिजे अशातला काही भाग नाही. अजित पवार अतिशय चांगले काम करत आहेत, लढत आहेत. ते राज्य अध्यक्ष आहे, बावनकुळे यांनी न पटणारे, हस्यास्पद विधान करु नये. शरद पवार चांगले काम करतात. मी त्यांची शिवाजी महाराज यांच्या सोबत तुलना करतो, असं नाही. तुम्ही मोदींना विष्णूचा अवातार म्हणतात, आम्ही काय म्हणतो का? शरद पवार आम्हाला गोर गरीबांचा जाणता राजा वाटतात.
या पदव्या जनतेतून आपोआप मिळतात लोक त्यांना जाणता राजा म्हणतात,
मग विरोधकांना एवढा त्रास का होत आहे? माझा डोळा फक्त बावनकुळे यांच्यावर आहे.
आम्ही काही राजकारणात नवीन नाही, कुणाच्या काही बोलण्याने आम्ही बहकणार नसल्याचे भुजबळ म्हणाले.

 

 

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbals criticism of chandrasekhar bawankule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा