”आम आदमीसे मन की बात और अदानी अंबानी से धन की बात” 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस च्या काळात देशात दहशतवाद वाढला होता याच कारण म्हणजे काळा पैसा पण आता नोटबंदी केल्यावरही सीमेवर जवान का मरतायेत ? नसीरूद्दीन शहाने हे काय चाललयं विचारल तर त्याला पाकिस्तानात जा म्हणता. तुमच्या बापाने देशाचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का ? ” अशा आक्रमकतेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकार चा समाचार घेतला.

औंरगाबाद जिल्ह्यात काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या सभेत भुजबळ बोलत होते. “नेहरू, गांधींना शिव्या देत तुम्ही साडेचार वर्षात देशाची वाट लावलीत. काळ्या पैशामुळे दहशतवाद वाढला असे सांगून नोटाबंदी केलीत. पण आजही आमचे जवान सीमेवर शहीद होतायेत. मग नोटाबंदीचा फायदा कुणाला झाला. “घर घर नाली, घर घर गॅस, आम आदमीसे मन की बात और अदानी अंबानीसे धन की बात” असे म्हणत भुजबळांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.

“अडीच वर्ष मला तुरूगांत रहावे लागले, मला का पकडले हे अजूनही कळले नाही. एवढेच नाही ज्या अधिकाऱ्यांनी मला तुरूंगात टाकले त्यांनाही ते कळले नाही. आधी आठ मग दहा हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले गेले. शेवटी शंभर कोटींवर येऊन थांबले.”

” विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनच्या बांधकामाचे कंत्राट मी दिलेच नव्हते. बर ज्या कंत्राटदाराने बांधले त्याला चार वर्षात एक रूपयाही दिला नाही. हा प्रकार म्हणजे पाच फुटांच्या म्हशीला पंधरा फुटांचा रेडकू असा,” असल्याची टिका छगन भुजबळ यांनी केली.

Loading...
You might also like