‘नो मेकअप लूक’मध्ये दीपिका पादुकोणनं केलं ‘फोटोशूट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा आहे. दीपिकाच्या सौंदर्यापासून ते तिच्या अभिनयापर्यंत चाहते तिला लाईक करतात. तिच्या चित्रपटाचे चाहते दिवाने आहे. दीपिका सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो सोशल मिडियावर फोटो शेअर करत असते. तिचे फोटो चाहते खूप पसंत करतात.

नुकतेच तिने काही फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये दीपिकाने विना मेकअप फाटोशूट केला आहे. दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये दीपिका खूप सिंपल लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

‘अनफिल्टर्ड इन आर ऑगस्ट २०१९ इश्यू’ असे कॅप्शन देत दीपिकाचे हे ग्लॅमरस फोटोशूट फोटो वोग इंडियाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले गेले आहे. या फोटोमध्ये दीपिका खूपच हॉट आणि सेक्सी अंदाजात दिसून येत आहे. प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा घायाळ करणारा लुक खूप खास आहे. हे फोटो दीपिकाने सुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

फोटोमध्ये दीपिकाने घातलेले कपडे प्रसिद्ध डिझायनर अनाईता श्रॉफ अडजानिया हिने डिझाईन केले आहे. दीपिकाचे हे फोटोशूट ग्रेग स्वेल्स या फोटोग्राफरने केले आहे. तिचा हा सामान्य लुक ही चाहत्यांना घायाळ करणारा आहे. सध्या तिच्या या लुकची सोशल मिडियावर खूप चर्चा आहे.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर ती सध्या ‘छपाक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिकाने एका अ‍ॅसिड हल्ल्यातील लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे.

आरोग्यविषयक वृत्त