‘रिपोर्टर’नं दीपिका पादुकोणला ‘प्रेग्नेंसी’बाबत विचारला ‘प्रश्न’, अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हाला विचारून प्लॅन करू ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या आपल्या छपाक या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. त्यामुळे दीपिका पत्रकारांशी वारंवार संवाद साधत असते. पत्रकार देखील दीपिकाला तिच्या चित्रपटाव्यतिरिक्त खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारात असतात. असच दीपिकाला एका पत्रकाराने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला आणि दीपिकाने न राहून अतिशय खोचक शब्दात त्या प्रश्नाचे उत्तर दिले.नुकतेच दीपिका पादुकोणच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

अशा परिस्थितीत दीपिकाला तिच्या गरोदर पणाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. आतापर्यंत दीपिका हे प्रश्न विनोद करत टाळत होती. पण यावेळी दीपिकाने या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे दिले आहे की आता तिला कोणीही असा प्रश्न विचारण्याची हिम्मत करणार नाही. छपाकच्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकाराने दीपिकाला विचारले, अशी अफवा आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात ? या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाने म्हंटले की,मी तुम्हाला प्रेग्नेंट दिसते का ? मी तुम्हाला विचारेल की फॅमिली प्लॅनिंग करू का ? आणि जर तुम्ही परवानगी दिली तर, मी काहीतरी प्लॅन करेल, जर मी प्रेग्नेंट असेल तर 9 महिन्यांनी तुम्ही स्वतः पहाल असे सडेतोड उत्तर यावेळी दीपिकाने दिले.

दीपिकाचे हे उत्तर ऐकून सगळे चकित झाली. लग्नापासून दीपिकाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात बरेच संतुलन राखले आहे. दीपिका आपल्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देते. त्याचबरोबर ती कामाकडे देखील लक्ष देते मात्र या प्रश्नावर ती काहीशी चिडलेली दिसून आली. ‘छपाक’ 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिका ऍसिड हल्ल्यातील मालती या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. मेघना गुलजार या चित्रपटाची दिग्दर्शक आहे. विशेष म्हणजे दीपिका या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात उतरलेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/