आता बSSSस्स ! सहनशिलतेचा ‘कडेलोट’ होतोय, ‘हिंगणघाट’ घटनेवर ‘छत्रपती’ संभाजीराजे संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट येते एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत प्राध्यापिका गंभीर जखमी झाली असून या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवरून छत्रपती संभाजी महाराज संतापले असून आता बस्स, सहनशिलतेचा कडेलोट होत आहे. महाराष्ट्राची कोणत्या दिशेला वाटचाल होत होत आहे ? असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला आहे.

या घटनेवर छत्रपती संभाजी महाराज यांनी फेसबुक पोस्ट लिहिताना म्हटले आहे की, माणूसपणाला काळीमा फासणारी ही घटना आहे. हे वाक्य फार हलकं वाटेल अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली. त्या नराधमांनी एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समण्यासारखे आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्या समोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे.

संभाजीराजे पुढे म्हणतात, महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे ? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र ? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र ? हाच का तो परस्त्री सदा बहिणी – माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र ? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमांना कोणती शिक्षा केली असती ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. लोक ते समजून जातील. महाराष्ट्र पोलिसांनी हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.