संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime | बीएचएमएसचे (BHMS Girl Suicide) शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. ‘तू माझ्याशी बोल, मला भेटली नाही तर मी विद्युत डीपीवर चढून जीव देईन’, अशी धमकी तरुणाने दिल्याने त्यातूनच तरुणीने गळफास घेत आयुष्य संपवले आहे.
ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील एन ५ सिडको भागात असलेल्या हॉस्टेलमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गायत्री बाबासाहेब दाभाडे (वय २१ वर्ष रा. संतोषी माता नगर वैजापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. तर दत्तू बाबासाहेब गायके (रा.जानेफळ, ता-वैजापूर) असे एकतर्फी प्रेमातून धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
गायत्रीची मावशी कल्पना गजानन सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे
की , गायत्री सिडको एन ५ भागातील विजयश्री कॉलनीतील होस्टेलमध्ये राहून बीएचएमएसचे शिक्षण घेत होती.
यावेळी आरोपी दत्तू हा गावातील असून त्याने गायत्रीला वारंवार फोन करून त्रास दिला होता.
तू माझ्याशी फोनवर बोल, तू मला भेटली नाही तर मी विद्युत डीपीवर चढून माझं आयुष्य संपवेन, अशा धमक्या तो देत होता.
दत्तूच्या सततच्या त्रासाला कंटाळून गायत्रीने हॉस्टेलमधील फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये दत्तू गायके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेलुरे करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
PCMC News | अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ; पिंपरी महापालिकेच्या उपायुक्त, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटिसा
Supreme Court On Sub Categorization In SC-ST | अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता;
राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार