Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे. सुनील रघुनाथ जगधने (वय 23 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत सुनील हा प्लंबरचं काम करत होता. मृत सुनीलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
सुनील जगधने याने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तो छत्रपती संभाजीनगरातील एम 2 परिसरातील रहिवासी होता. त्याने झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. काही दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी घरी येऊन या तरुणाला शिवीगाळ केली होती तसेच सासरचे लोक बायकोला आणि चार महिन्यांच्या बाळाला घेऊन गेले होते. यामुळे सुनील तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केली.

या प्रकरणी मृत सुनीलच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सासरच्या छळाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप मृत सुनील याचे वडील रघुनाथ जगधने
यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | tired of being harassed by his father in law the young man took the extreme step

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल