Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | ‘तू एकटक का पाहतोस?, कॉलर का उडवतोस? म्हणत कॉलेजमध्ये वाद, तरुणाला बेकाररित्या संपवलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | 'Why are you staring? Why are you blowing your collar? Argument in the college saying, the young man ended up useless

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | पदवीचे शिक्षण घेणाऱ्या बीसीएसच्या विद्यार्थ्यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे (वय-१९, रा- पिंपरखेड, ता-वडवणी, जि -बीड) या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवार (दि.११) महाविद्यालयातील काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादावेळी ‘तू एकटक का पाहतोस?, कॉलर का उडवतोस? अशा कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांतीच्या रात्री (दि.१४) प्रदीपचे मित्र बाहेर गेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटमध्ये घुसून त्याची गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता उस्मानपुऱ्यात उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप मूळचा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील असून देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो आपल्या एका मावस भावासह अन्य तीन मित्रांसोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. मंगळवारी सर्वजण महाविद्यालयातून फ्लॅटवर परतले होते.

सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते, परंतु प्रदीप मात्र फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता त्याचे भाऊ आणि मित्र परतले, तेव्हा त्यांनी प्रदीपला गळा कापलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक सखोल चौकशी केली जात आहे.

Total
0
Shares
Related Posts