Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली आज (16 जून) कोल्हापूर येथे मराठा क्रांती (Maratha Revolution) मूक आंदोलन (Silent movement) यशस्वीपणे संपन्न झालं आहे. या आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि सर्व आंदोलकांशी खा. संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी संवाद साधला. सवांद साधतेवेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी 4 जून रोजी आपल्याला भेटण्यासाठी फोन केला होता, असा खुलासा केलाय. परंतु, एकांतात भेट घेण्याचे आपण टाळले असे देखील खा. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar’s phone call was received that day, Sambhaji Raje’s big revelation)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर…

संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) बोलताना म्हणाले, अजित पवार (Ajit pawar) यांनी याआधी देखील मला (4 जून) रोजी फोन केला होता की, आपण मुंबईमध्ये भेटू. परंतु, मी त्यांना सांगितलं की, आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत, मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. असे संभाजीराजें (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, म्हणून मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री असले पाहिजेत आणि सकल मराठा समाजाचे (Maratha society) प्रमुख समन्यवक पाहिजेत. तेव्हाच आरक्षण विषयी चर्चा होऊ शकते. असे संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी स्पष्ट केले आहे.

पण मी एकटा चर्चेला मुबईला जाणार नाही…
राज्य शासनाने (State government) चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे त्याचं स्वागत आहे. परंतु, मी एकटा चर्चेला मुंबईला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असं संभाजीराजेनी (Chhatrapati Sambhaji Raje) म्हटलं आहे. आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. मात्र, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि अन्य मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासोबत चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी एक चांगली बाब असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय…

समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल अथवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. परंतु, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये देखील जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू असेही संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) म्हटलं आहे.

त्यामुळे आज आंदोलन करावं लागलं…
9 दिवस झाले राज्य सरकारने काही निर्णय घेतला नाही.
म्हणून आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो.
मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील.
लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे.
आम्ही देखील माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही.

Web Title :- Chhatrapati Sambhaji Raje । deputy chief minister ajit pawar had called for a meeting to mumbai say sambhaji raje at kolhapur

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

bjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज

Maratha Reservation | हसन मुश्रीफांची गर्जना, म्हणाले- ‘सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, आघाडी सरकारची ‘ती’ चूक मान्य’