Chhatrapati Sambhaji Raje | तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यामध्ये छत्रपतींच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhatrapati Sambhaji Raje | राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje) यांना तुळजापूर (Tuljapur) येथील तुळजाभवानी मंदिराच्या (Tulja Bhavani Temple) गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. छत्रपतींच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने राज्यभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

 

खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) काल (मंगळवारी) तुळजाभवानी मंदिरात गेले असता त्यांना नियमांची यादी दाखवत गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. मंदिराचं आणि देवीचे महत्त्वं पाहता हे पावित्र्य अबाधित रहावे आणि देवस्थळी कोणत्याही वादाची ठिणगी पडू नये, यासाठी संभाजीराजे मुखदर्शन घेऊन मंदिर परिसरातून रवाना झाले. दरम्यान, या प्रकाराचे पडसाद आता राज्यातून आणि संभाजीराजे समर्थकांमधून उमटत असल्याचे दिसत आहे.

 

संभाजीराजे तेथून निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते, समर्थक प्रचंड आक्रमक झालेत.
संभाजीराजेंना मंदिर प्रशासनाने दिलेली वागणूक संतापजनक असून,
तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे.

खा. संभाजीराजे यांना मिळालेल्या या वागणुकीनंतर त्यांनी मंदिरातील प्रशासकीय
अधिकाऱ्यांना फोन करतत्यांना सणसणीत भाषेत सुनावलं आहे.
त्यानंतर ते तिथून संतापातच निघून गेले. या संपूर्ण प्रकारानंतर मंदिर संस्थानचे
धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे (Nagesh Shitole) यांच्या निलंबनाची मागणी केली जातेय.
त्याचबरोबर कारवाई न झाल्यास बोबं मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील
मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) देण्यात आला आहे.

 

Web Title :- Chhatrapati Sambhaji Raje | Chhatrapati Sambhaji Raje stopped entering from tuljabhavani temple know reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा