Chhatrapati Sambhaji Raje | ‘छत्रपतींच्या भूमीत औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे चुकीचे’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Chhatrapati Sambhaji Raje | एमआयएमचे नेते अकबरुद्दिन ओवैसी (MIM Leader Akbaruddin Owaisi) यांनी आपल्या समर्थकासह औरंगाबाद (Aurangabad) येथे औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसतं आहे. यावरुन सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी देखील ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर आता राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

नाशिक (Nashik News) येथे माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, ”अकबरुद्दिन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, कबरीवर चादर चढवली असे माझ्या कानावर आले आहे. याबाबत मला फारशी कल्पना नाही, त्यामुळे लगेचच प्रतिक्रिया देणे योग्य नाही. यावर अभ्यास केल्यानंतर बोलणे योग्य राहील.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”औवेसींनी तसे केले असेल तर ते अजिबात योग्य नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमी आहे, छत्रपतींच्या भूमीत असे करणे योग्य नाही,” असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Chhatrapati Sambhaji Raje | it is wrong to go to aurangzebs grave in chhatrapatis land Chhatrapati Sambhaji Raje

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा