Chhatrapati Sambhaji Raje : ‘डॉ. आंबेडकर-शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजे Chhatrapati Sambhaji Raje यांनी शनिवारी (दि. 29) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का?. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.

खासदार छत्रपती संभाजीराजे Chhatrapati Sambhaji Raje म्हणाले की, या विषयावर दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदारांना आमंत्रित करणार असल्याचे ते म्हणाले. विनायक मेटे यांच्या 5 जूनच्या मोर्चाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आता कोणीही मराठा समाजाला वेठीस धरु नये असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेनी पुढाकार घेतला तर हा शिळेपणा दूर होईल असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. शरद पवारांचे राजकारण नेहमी नरो वा कुंजरोवा अशाप्रकारचे राहिले आहे. पण पवार इथून पुढे स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा आज आलेला निर्णय कायदेशीर असल्याचे मी मानत नाही, असे ते म्हणाले. ओबीसी आरक्षण अझम्शन बेस्ड असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार