Chhatrapati Sambhajinagar Accident News | छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात; 1 ठार तर 3 जण जखमी

0
130
Chhatrapati Sambhajinagar Accident News | fatal accident involving two wheeler and loading rickshaw in chhatrapati sambhajinagar one dead three seriously injured
file photo

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajinagar Accident News | छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. दुचाकी आणि छोट्या लोडिंग गाडीमध्ये हा अपघात झाला आहे. दिलीप उदयभान जाधव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर जाधव यांची पत्नी आणि दोन मुलं या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Accident News)

 

काय घडले नेमके?
जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरात दुचाकी आणि छोट्या लोडिंग रिक्षामध्ये हा अपघात झाला आहे. मृत दिलीप जाधव हे आपली पत्नी आणि दोन मुलासह दुचाकीवरून जात होते. यादरम्यान हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये दिलीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

 

अपघातग्रस्त कुटुंब हे बुलडाण्यातील रहिवाशी आहेत.
हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
या अपघातातील जखमी व्यक्तींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Web Title :- Chhatrapati Sambhajinagar Accident News | fatal accident involving two wheeler and loading rickshaw in chhatrapati sambhajinagar one dead three seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले