Chhatrapati Sambhajinagar Crime News | शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा; लॉज मालकाला बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajinagar Crime News | मागच्या काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामध्ये मारहाण (Beating), आर्थिक फसवणूक (Cheating Case) तसेच आत्महत्या (Suicide), खून (Murder) यांचा समावेश आहे. अशीच एक हाणामारीची घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Crime News) जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून जमावाने लॉज मालकास आणि मुलास बेदम मारहाण केली आहे. हि मारहाणीची घटना वैजापूर इथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वैजापूर शहराजवळ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर (Mumbai-Nagpur Highway) ही मारहाणीची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शौचालयामध्ये जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी जमावाने रागाच्या भरात लॉज चालक आणि त्याच्या वडिलांना लोखंडी रॉडने फिल्मी स्टाइलने बेदम मारहाण केली.

या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तौसीफ हनिफोद्दीन शेख, सय्यद अजहर कदीर आणि जमील सगीर शेख यांना
अटक केली आहे. तर या प्रकरणात इंगळे वस्तीवर राहणारे लॉजचालक आकाश मापारी आणि त्यांचे वडील
संजय मापारी यांना आरोपींनी केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. या मारहाणीच्या घटनेमुळे वैजापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Crime News | अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाची धारधार शस्त्राने हत्या

Nashik Crime News | वसुलीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, कामगाराची बाईक घेऊन आरोपींनी काढला पळ; नाशिकमधील घटना

MLA Uday Samant | ‘योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो’, उदय सामंत यांची जाहीर सभेत कबुली