Chhatrapati Sambhajinagar Crime News | सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमप्रकरणातून एका 16 वर्षीय युवकाचा खून

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajinagar Crime News | छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून एका दहावीत शिकणाऱ्या एका मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना वैजापूरच्या भिवगाव शिवारामध्ये घडली आहे. मृत तरुणाचे नाव सचिन प्रभाकर काळे (वय 16 वर्ष) आहे. मृत सचिन हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

मृत सचिन काळे हा विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. यादरम्यान त्याचे एका मुलीवर प्रेम होते याची कल्पना त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नव्हती. सचिनने त्या मुलीला काही दिवसांपूर्वीच मोबाईल गिफ्ट दिला. 25 फेब्रुवारीला तो मुलीला भेटण्यासाठी गेला तेव्हापासून सचिन हा बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृतदेह सापडला. सचिन काळेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. यावेळी सचिनचा मृतदेह एक हात तुटलेल्या अवस्थेत होता. तर वन्य प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील काका आणि आजोबांना ताब्यात घेतले आहे.
मृत सचिन 25 फेब्रुवारीला मुलीला भेटायला गेला असता याची माहिती मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली आणि त्यावेळी मुलीचे वडील,
काका आजोबांनी सचिनला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह शेतात टाकला.
जवळजवळ चार दिवसांनी सचिनचा मृतदेह आढळून शेतात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title :- Chhatrapati Sambhajinagar Crime News | repeat of the sairat incident in chhatrapati sambhajinagar young man was killed in a love affair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagaland Election Result | नागालँडमध्ये आठवलेंनी इतिहास घडवला, RPI आठवले गटाचे 2 उमेदवार विजयी

Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; राखी सावंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव गुलदस्त्यात

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)