Chhatrapati Sambhajinagar Crime News | मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली अन् आईनेही सोडले प्राण, अवघ्या 9 तासात माय-लेकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Crime News | The news of the child's death came to light and the mother also passed away, mother-son's death in just 9 hours

छत्रपती संभाजीनगर: Chhatrapati Sambhajinagar Crime News | मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने अवघ्या ९ तासातच जन्मदात्या आईने देखील आपले प्राण सोडल्याची घटना सोयगाव तालुक्यातील तिडका गावात घडली आहे. पांडुरंग नामदेव गवळी (वय-४७) व निर्मलाबाई नामदेव गवळी (वय-७०) असे मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहे.

याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग गवळी हे काही दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणात पांडुरंग गवळी यांची प्रकृती अधिक खालावली. या दरम्यान ११ जानेवारीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पांडुरंग गवळी यांचा मृत्यू झाला. आपला आजारी मुलगा पांडुरंग याच्या मृत्यूची बातमी आई निर्मला गवळी यांना समजली.

मुलाचे निधन झाल्याची बातमी ऐकत असताना त्यांना जबर धक्का बसला. यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. पांडुरंग गवळी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना गोदेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गोदेगाव येथील खाजगी रुग्णालयात निर्मलाबाई यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

इकडे मुलावर अंत्यसंस्कार होत असताना आईने रुग्णालयात प्राण सोडले. दरम्यान निर्मलाबाई गवळी यांच्यावर रविवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ९ तासाच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने तिडका गावात शोककळा पसरली आहे.

Total
0
Shares
Related Posts
Pandharkawada Crime Court News | Accused sentenced to 3 years rigorous imprisonment for molesting a minor girl in Maregaon; Additional District and Sessions Court of Pandharakavda

Pandharkawada Crime Court News | मारेगांव येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा; पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल