Chhatrapati Sambhajinagar News | आर्थिक अडचणीत सापडलेल्या बिल्डरचे सुसाईट नोट लिहून पलायन

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar News | बांधकाम क्षेत्रातील ताण-तणावामुळे तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या राहुल नंदगवळी (वय 42, रा. उल्कानगरी तिरुपती एक्झिक्युटिव्ह राजगड बिल्डिंग फ्लॅट नंबर 17) हा बिल्डर सुसाईड नोट लिहून पसार झाला आहे. या प्रकरणी राहुल यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राहुल बसवंत नंदगवळी हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी रिकामे प्लॉट किंवा जुन्या घरांच्या मोठ्या प्लॉटवर टोलेजंग इमारती उभारून विविध बिल्डिंग डेव्हलपमेंटच्या स्कीम राबविल्या आहेत. त्यांनी उल्कानगरी, सातारा परिसर, कांचनवाडी, तीसगाव, वाळूज सिडको महानगर, पडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी डेव्हलपमेंट करून प्रकल्प उभे केले आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

मात्र बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट पसरल्याने त्यांचे विविध स्कीम मधील रो-हाउस, फ्लॅट बुकिंग झालेले नाही.
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्कीम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
या आर्थिक अडचणींमुळे ते मागच्या काही दिवसांपासून तणावात होते.
त्यांच्या बिझनेस पार्टनर आणि मित्र परिवाराने त्यांची समजूत काढली. मात्र, बिझनेस पार्टनर आणि
मित्र परिवारांकडून स्कीमसाठी घेतलेले पैसे त्यांना स्वत:लाच अडचणीचे ठरत होते.
या सर्वातून मुक्त होण्यासाठी मी आत्महत्या करत आहे असे राहुल यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.
या प्रकरणी राहुल यांच्या नातेवाईकांनी राहुल बसवंत नंदगवळी हे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी तातडीने राहुल नंदगवळी यांचा
शोध घेण्यासाठी तपास सुरू केला तसेच राहुल नंदगवळी यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास
जवाहरनगर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असेही आवाहनदेखील त्यांनी लोकांना केले आहे.

Web Title :- Chhatrapati Sambhajinagar News | builder left house after writing a note in chhatrapati sambhajinagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा