कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajiraje | मागच्या 2-3 दिवसांत राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना फटका बसला आहे तर दुसरीकडे आंबा, केळी आणि द्राक्ष या फळबागांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे राज्यातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे. राज्य शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे.
अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 19, 2023
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती ?
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अद्यापदेखील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. यावरुन संताप व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी एक ट्विट केलं आहे. ‘अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले. या परिस्थितीमध्ये राज्यसरकारने व कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल’ असे संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
अवकाळीचा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात आतापर्यंत 6 जणांचा बळी गेला आहे.
तर 40 हून अधिक जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत. तब्बल 16 हजार हेक्टरवरील पिकं अवकाळीमुळे भुईसपाट झाली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
Web Title :- Chhatrapati Sambhajiraje | sambhaji raje chhatrapati criticized the government on the issue of farmers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले