Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp In Bibvewadi Of Pune | बिबवेवाडी येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

पुणे : Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp In Bibvewadi Of Pune | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध (ITI Aundh) यांच्यावतीने ३० मे रोजी सकाळी १०.३० वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, बिबवेवाडी, पुणे-सातारा रोड (Pune-Satara Road) येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे प्रभारी उपसंचालक वाय. डी. कांबळे (Y.D. Kamble) यांनी कळविले आहे.

या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. कोर्सच्या पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असून स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. (Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp In Bibvewadi Of Pune)

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नोंदणीसाठी क्यू. आर. कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी क्यू. आर. कोडच्या सहाय्याने नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title : Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp In Bibvewadi Of Pune

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shubman Gill | शुभमन गील आणि सचिन तेंडूलकरचा हितगुज करताना फोटो व्हायरल; नेटिझन्सनच्या भन्नाट कमेंट्स

NCP Chief Sharad Pawar | ‘नव्या संसद भवनाची इमारत बांधताना…’ शरद पवारांचा गंभीर आरोप

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)