Chhatrapati Shivaji Maharaj | शिवरायांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा नागपुरात स्थापित होणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सिंहासनारुढ 41 फुटांच्या पुतळ्याची स्थापना नागपूर येथे करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) महाराज बाग येथील कार्यालयीन परिसर यासाठी निवडण्यात आला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial Committee) वतीने महाराज बाग जवळील नागपूर विद्यापीठ परिसरात सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. दि.18 जूनला या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित असणार आहेत. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.

 

यंदा नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नेतृत्वात लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. शिवरायांचा हा सिंहासनारुढ पुतळा ब्राँझ धातूचा असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातून रीतसर परवानगी घेण्यात आली आहे.

 

कसा असेल सिंहासनारूढ पुतळा?

Advt.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळाच्या चबुतऱ्याची लांबी 20 फूट, तर रुंदी 15 फूट तर उंची 9 फूट असेल.
तर सिंहासनारुढ पुतळ्याची उंची 32 फूट असून त्यावरील छत्र 7 फुटांचे असेल. ब्राँझ धातूने बनवल्या जाणाऱ्या
या पुतळ्याचे वजन सुमारे 10 हजार किलो असण्याची शक्यता आहे.

 

Web Title :  Chhatrapati Shivaji Maharaj | 41 feet enthroned statue of
chhatrapati shivaji maharaj to be installed in nagpur nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा