वाचन संस्कृती जतनासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकाचे वाटप

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – परिवर्तन संघर्ष संघटना पुणे यांचेवतीने थेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची संपूर्ण ओळख व्हावी यासाठी “शिवाजी महाराज “या पुस्तकाचे वाटप करुन एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली.

अनेकजण या दिवशी भव्य मिरवणूक काढून ढोल ताशे बॅड आदीवर मोठा खर्च करतात. परंतु सध्या छत्रपतींच्या विचाराचे बिजारोपण बाल मनावर रुजविणे आवश्यक आहे. याच सार्थ हेतूनं हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देण्याचा निर्णय संघटनेने घेतला विशेष म्हणजे सध्या मोबाईलचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत आणि वाचन संस्कृती हळूहळू मागे पडत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष सागर खोत, संतोष काकडे, सुनिल चव्हाण, विजय जाधव, सागर भालेराव, अमित चव्हाण, सोमनाथ जाधव, गणेश कांबळे या वेळी संघटनेचे अन्य सभासद उपस्थित होते. संघटना गेले ५ वर्ष अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहेत.