Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award | छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

सातारा : Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award | महाराष्ट्र शासना मार्फत सन 2018 करिता राज्य स्तरावरील ग्राम/जिल्हा/विभाग या संवर्गा करिता जाहिर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते नुकताच पोलीस अधिक्षक समीर शेख यांना देण्यात आला.

तसेच महाराष्ट्र शासना मार्फत सन 2018 करिता राज्य स्तरावरील ग्रामपंचायत या संवर्गा करिता माण तालुक्यातील बिदाल गावच्या गौरी जगदाळे, सुरेश जगदाळे, प्रमोद जगदाळे, बापुराव जगदाळे यांनी स्वीकारला. (Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award)

सन 2018 या वर्षाकरिता छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने रोहित बनसोडे गोंदवले खुर्द यांना तृतीय क्रमांकाने पारितोषिक देवून गौरविण्यात आले. तसेच सन 2019 या वर्षाकरीता सामाजिक वनीकरण विभाग सातारा कार्यक्षेत्रातील राज्य स्तरावरील शैक्षणिक संस्था संवर्गाकरीता मुधोजी विद्यालय, फलटण या संस्थेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले तर स्व. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे ता. कराड या संस्थेत तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

या परितोषिक वितरण कार्यक्रमास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ,
वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल (B Venugopal IAS),
प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनिता सिंग (Dr. Sunita Singh) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title :- Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award | Distribution of Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश

Adv. Gunaratna Sadavarte | अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ‘ती’ चूक भोवली, वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न करणार्‍याला 4 तासात अटक