Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe | शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, इंद्रजीत सावंत हे…

जुन्नर : Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe | मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखे लंडनमधून भारतात ३ वर्षांसाठी आणण्याकरता प्रक्रिया सुरू केली आहे. ही वाघनखे आणण्यासाठी आणि करार करण्यासाठी आज मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत. दरम्यान, या वाघनखांच्या सत्यतेबाबतच इतिहासकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील जुन्नर येथे बोलताना आपले मत मांडले. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe)

लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांबाबत कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, असे मत व्यक्त केले आहे. याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मला काही त्यातले ज्ञान नाही. मात्र, इंद्रजीत सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe)

त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत वेगळे मत आहे हे मी टीव्हीवर पाहिले. असे असले तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.

इतिहास संशोधकांनी उपस्थित केले प्रश्न

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखे तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. कारण, ही शस्त्रे सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखे महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखे नाहीत हे स्पष्ट आहे.

साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघनखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. म्हणजेच, इ.स १९१९ च्या आधी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखे ही शिवाजी महाराज यांची असूच शकत नाही.

इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवले होते.
त्या महाराजांनी ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता
आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती, त्यांना भेट म्हणून वाघनखे दिली होती.
ती वाघनखे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली.
तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहे.
त्या वाघनखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील
ती वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे असल्याची कोणतीही नोंद नाही.

शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे आणण्याची कथा रचली जात आहे. हे साफ खोटे आहे.
इतिहासाच्या कसोटीवर हे टिकणार नाही. सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये.
ही वाघनखे शिवाजी महाराजांच्या वापरातील असतील, तर त्याचे पुरावे सरकारने सादर करावेत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray On BJP | ‘एकट्या आदू बाळानं सगळ्यांना सळो की पळो केलंय‘ – आदित्य ठाकरे