‘छत्रपती’ अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा हाच ‘इतिहास’ : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हल्लाबोल होत आहे. बीड येथे झालेल्या मेळाव्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले हा 21 व्या शतकातील इतिहास असल्याचे सांगत त्यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली.

आष्टीच ‘बेणं’ भाजपात –
सुरेश धस यांच्यावर निषाणा साधताना मुंडे म्हणाले, आष्टीचं बेण भाजपात गेलं. इथं रोजगार नव्हता म्हणून ते शिवसेनेत गेले असे म्हणत त्यांनी जयदत्त क्षिरसागर यांच्यावर टीका केली. उदयनराजेंना टार्गेट करताना, राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले, जे कावळे होते तेही गेले. पण, छत्रपतींचे मावळे आणि महाराष्ट्राची जनता तुमच्यासोबत आहे, असे सांगत राज्यातील जनता शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘छत्रपतींना’ खुप त्रास झाला –
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर छत्रपतींना खुप त्रास झाला. आपल्याला तो इतिहास माहित आहे मात्र, 21 व्या शतकात जी घटना घडली याचा इतिहास पुढे काय लिहिला जाणार. छत्रपती अनाजीपंताला शरण गेले, हाच इतिहाच भविष्यात लिहला जाईल असे म्हणत त्यांनी उदयनराजेवर टीका केली. तसेच आपण छत्रपतींच्या गादीचा आदर करतो हे देखील सांगायला ते विसरले नाहीत.

visit : policenama.com

You might also like