नव्या झेंड्यावरून वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची ‘चपराक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पक्षाच्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगात असून त्यावर राजमुद्रा वापरण्यात आली आहे. मनसेने झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याने विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात येत आहे. मनसेने झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याने आता नवा वाद निर्माण झाला असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.

बाळा नांदगावकर म्हणले, विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ही आमची टँगलाइन आहे. त्यातून सगळं स्पष्ट आहे. काही लोकांनी राजमुद्रेवरून वाद निर्माण केला असले त्यांना विनंती आहे की, छत्रपतींना जसं तुम्ही आदर्श मानता तसे आम्ही देखील छत्रपतींना आदर्श मानणारे आहोत. छत्रपती शिवरायांनी जसं लोककल्याणकारी राज्य निर्माण केले तोच आमचा देखील विचार आहे. आणि हाच विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे नांदगावर यांनी सांगितले.

बाळा नांदगावकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र पुन्हा उभा करण्याचा मानस आहे. देश हितासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी जे योग्य असेल ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाअधिवेशनासाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बारकोड लावलेले ओळखपत्र देण्यात आले आहे. ओळखपत्र असणाऱ्यांनाच अधिवेशनात उपस्थित राहता येणार होते. मात्र, राज ठाकरेंनी भाषणासाठी सर्वांना महाअधिवेशन खुले करण्यात येणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –