सरकारी कार्यालयात ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ घालुन येण्यास कर्मचार्‍यांना बंदी : जिल्हाधिकार्‍याचा ‘फतवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगड मधील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक नवी फर्मान काढले आहे. कार्यालयीन वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याने भडकाऊ रंग असलेले कपडे त्याचप्रमाणे जीन्स आणि टी- शर्ट यांसारखे कपडे परिधान करून ऑफिसला येऊ नये. त्याचप्रमाणे हा नियम मोडला तर त्यांना कायदेशीर कारवाई त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाईला देखील सामोरे जावे लागेल.

विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हणण्यात आले आहे कि, कार्यालयीन वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याने भडकाऊ रंग असलेले कपडे त्याचप्रमाणे जीन्स आणि टी- शर्ट यांसारखे कपडे परिधान करून ऑफिसला येऊ नये.

फॉर्मल कपडे आणि चांगले कपडे घालून यावेत असे देखील आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी देखील आपला गणवेश परिधान करून येत नाहीत. यासाठी त्यांना धुलाई भत्ता देखील दिला जातो. मात्र यापुढे त्यांना गणवेश घालणे हे बंधनकारक राहील. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशातच कार्यालयात यावे.

दरम्यान, जर यापुढे कर्मचाऱ्यांनी हा आदेश पाळला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मसाज सुविधा