छत्तीसगड कांग्रेसची मोदींवर टीका – ‘जो महामारी को भी महोत्सव बना दे…उसे नरेंद्र दामोदर दास कहते हैं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धामध्ये जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी जनता कर्फ्यूनिमित्त पंतप्रधानांनी थाली-टाळी वाजवायला सांगितले होते. दरम्यान, पंतप्रधानांची ही घोषणा छत्तीसगड कॉंग्रेसने ट्विट करुन त्यावर टीका केली आहे .

छत्तीसगड कांग्रेसकडून लिहण्यात आले आहे की , ‘जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जो महामारी को भी महोत्सव बना दे…उसे नरेंद्र दामोदर दास कहते हैं’.

सध्याच्या परिस्थितीनुसार छत्तीसगड कॉंग्रेसने बदललेला प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या विश्वनाथ चित्रपटाचा हा संवाद आहे. काँग्रेसबाबत बोलायचे झाल्यास काँग्रेसकडून वारंवार टीका केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावर देखील काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

तेज प्रताप यांची टीका, सुशील मोदींचे उत्तर

आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनीही दीप प्रज्वलित करण्याच्या मुद्द्यावरून ट्विट केले आणि लोकांना सांगितले की ते कंदीलही लावू शकतात. कंदील हे आरजेडीचे निवडणूक चिन्ह आहे. यावर उत्तर सुशील मोदी यांनी दिले.

सुशील मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘आता कंदिलांचे युग गेले, गावातही घरोघरी वीज पोहोचली आहे. हिंदू-ख्रिश्चनांच्या पूजेसाठी दीवा -मेणबत्त्या घरात ठेवल्या आहेत. प्रत्येकाकडे मोबाईल आहे म्हणून पंतप्रधानांनी कंदीलचा उल्लेख केला नाही. समजले, बाबुआ?

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशाला एक व्हिडिओ संदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी आवाहन केले की या रविवारी रात्री 9 वाजता लोकांनी त्यांच्या घरांच्या गेट व बाल्कनीत येऊन नऊ मिनिटांसाठी दीप प्रज्वलित करावे. किंवा मेणबत्ती-मोबाईल फ्लॅश लावा,असे आवाहन केले आहे. यामागे देश एक करणे असा उद्देश आहे. असे पंतप्रधान म्हणाले.