भाजप आमदाराच्या हत्येचा कट रचणाऱ्या २ नक्षलवाद्यांचा खात्मा

दंतेवाडा : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली आहे.

दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे महासंचालक गिरधारी नायक यांनी सांगितले, चकमकीत खात्मा झालेला नक्षली वर्गीस याच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो सुरूंगद्वारे स्फोट घडवण्यात तज्ज्ञ होता. भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like