छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान ‘शहीद’

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात महाराष्ट्रातील एक जवान शहीद झाला आहे. यामध्ये एका आयटीबीपी जवानाचा समावशे असून रमतेर मंगेश असे या जनवानाचे नाव आहे. रामतेर मंगेश हे मुळचे महाराष्ट्रातील नागपूर येथील होते. नारायणपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते. नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या आयईडीमध्ये झालेल्या स्फोटात हेड कॉन्स्टेबल रामतेर मंगेश यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंगेश हे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी होते. घटनेच्यावेळी भारत-तिबेट सीमा पोलिसांचा (ITBP) एक चमू मिशनवर होता.