पत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन पोहचला कोर्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील एक व्यक्ती शुक्रवारी न्यायालयात ५ पोत्यांमध्ये जवळपास ३३ हजार रुपये घेऊन पोहोचला. पत्नीला पोटगीच्या रूपात हि रक्कम त्याला द्यायची होती. न्यायालयात सुनावणीवेळी न्यायाधीशांनी पैश्याची मागणी करताच त्याने १,२,५ आणि १० रुपयांच्या शिक्क्यांनी भरलेली पोती न्यायालयात सादर केली. न्यायाधीशांनी हा आपला अपमान समजत या व्यक्तीला ते पूर्ण पैसे मोजण्याचे आदेश दिले आणि त्याचबरोबर हि संपुर्ण रक्कम पत्नीच्या घरी देण्याचे आदेश दिले. पुनीराम साहू असे या व्यक्तीचे नाव आहे.

महिलेच्या घरी देण्याचे आदेश

कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश किरण चतुर्वेदी यांनी या पतीला कडक आदेश देत हि चिल्लर मोजण्यास सांगितले . त्यानंतर त्याने सुरुवातीला हे सर्व पैसे मोजले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला हे पैसे पत्नीच्या घरी देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर २२ जुलै रोजी हे पैसे घरी पोहोचवल्याची पक्की पावती कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले.

भाजी विकून जमवले पैसे

या प्रकरणाविषयी बोलताना पुनीराम साहू म्हणाला कि, भाजी विकून हे सर्व पैसे गोळा केले आहेत. पत्नीला पोटगीच्या रूपात देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने मी हि चिल्लर कोर्टात जमा केली. ३३ हजार रुपये जमा करणे माझ्यासाठी अवघड होते, त्यामुळे मी हि चिल्लर दिली.

संपूर्ण घटना काय

जिल्ह्यातील कोसला या गावातील पुनीराम साहू याला चार मुली राहत आहेत. यातील ३ मुलींची लग्ने झाली असून मागील २० वर्षांपासून पती आणि पत्नी वेगळे राहतात. त्यामुळे मागील ८ महिन्यांपासून त्याने पत्नीला पोटगी दिली नव्हती. त्याला पत्नीला दरमहा ३७०० रुपये पोटगी द्यावी लागत होती. त्यामुळे मागील ८ महिन्यापासूनचे पोटगी त्याला देण्याचे आदेश दिले आहेत.

चिल्लर न्यायला करावी लागली गाडी

त्याला आपल्या पत्नीला एकूण ३३ हजार ८०० रुपये द्यायचे होते. मात्र या शिक्यांची ५ पोती असल्यामुळे त्याला ती नेण्यासाठी भाड्याची गाडी करावी लागली. जवळपास २० किलो या शिक्क्यांचे वजन होते. दरम्यान, महिलेच्या वकिलांनी याविषयी बोलताना सांगितले कि, अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा कुणी चिल्लर घेऊन आले होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like